मागील 24 तासांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक
टीम : ईगल आय मीडिया
दरम्यान मागील २४ तासांमध्ये २४ तासात ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ हजार ८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७९ टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना कोरोना लागण झाली आहे. १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९९ लाख ६५ हजार ११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६३ हजार ५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज समोर आलेल्या संख्येनुसार राज्यात ५ लाख ६० हजार ८६८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
मुंबईत करोनाचे ९२४ नवे रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. तर १ हजार १९२ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत २ लाख ७२ हजार ४४९ रुग्णांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी २ लाख ४९ हजार ९०३ रुग्णांनी करोनावर मात केली. तर आत्तापर्यंत एकूण १० हजार ६२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.