कोरोना रुग्णसंख्या 10 हजारांनी घटली

संचारबंदी चा चांगला परिणाम

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी चे चांगले परिणाम समोर येऊ लागले आहेत. तसेच निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी राज्यात आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल हीच संख्या 68 हजार होती. तर आज 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

दिवसभरात 52 हजार 412 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 10 हजारांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात काल दिवसभरात तब्बल 68 हजार 631 रुग्ण आढळून आले होते.


आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. त्यातील 31 लाख 59 हजार 240 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 76 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतही लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत आहे. कारण दिवसेंदिवस वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा घटल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दिवसभरात 7 हजार 381 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 86 हजार 622 रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 83 टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवसांवर आलाय. मुंबईत सध्या 86 हजार 410 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!