महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम !

दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची वाढ

टीम :  ईगल आय मीडिया

महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय.

राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलाय. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण 95.16 टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.46 टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९३ हजार ९१३ (१३.३८
टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!