पंढरपूर तालुका पुन्हा दीडशे पार !

पंढरपूर शहरातील रुग्णसंख्येत वाढ

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता अचानक वाढू लागली असून बुधवारच्या अहवालात तालुक्यात तब्बल 158 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पंढरपुर शहरात 66 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही. तरीही वाढती रुग्ण संख्या प्रशासनासाठी चिंताजनक आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या कोरोना अहवालानुसार पंढरपूर शहरात 66 आणि ग्रामीण भागात 92 नवीन रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यात पंढरपूर शहरातील रुग्णसंख्या अगदी 10 पेक्षा कमी झाली होती. तसेच ग्रामीण भागात ही 20 ते 30 पर्यंत रुग्ण रोजच्या अहवालात आढळून येत होते.

ही बातमी वाचलीत का ?

मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. बुधवारच्या अहवालानुसार पंढरपुर शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब असून आषाढी यात्रेनंतर शहरातील ही संख्या आणखी वाढते की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!