सलग दुसऱ्या वर्षी 16 हजार प्लस नवे रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोनाचा कहर कायम असून आज सलग दुसऱ्या दिवशी 16 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 50 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे.
या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे.
कोरोना संकट आणखी किती लोकांचा जीव घेईल? असा प्रश्न आता उद्भवतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत तब्बल 52 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर हा 2.28 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आज राज्यात एकूण ५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ८८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२८ टक्के इतका आहे. राज्यात आज ८ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख ३४ हजार ०७२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के इतके झाले आहे.