पंढरपूर तालुका : कोरोना रुग्ण संख्या दीडशे पार

पुन्हा एकदा जिल्ह्यातील 5 तालुक्यात वाढले रुग्ण

पंढरपूर : ईगल आत मीडिया

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा वाढली असून आजच्या अहवालानुसार तालुक्यात 150 हुन अधिक रुग्ण सापडले आहेत. 5 तालुक्यातील 8 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.

त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या सुद्धा वाढली असून सुमारे 15 दिवसानंतर 5 तालुक्यातील रुग्ण संख्या वाढली आहे. एका दिवसात 600 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा अहवाल आला असून त्यानुसार पंढरपूर तालुक्यात शहर आणि ग्रामीण असे 152 रुग्ण नव्याने सापडले आहेत. त्या पाठोपाठ माळशिरस तालुक्यातील रुग्णसंख्या 124 असून करमाळा 95, माढा 93 तर सांगोला 57, मोहोळ 55 असे रुग्ण आढळले आहेत.

या सर्वच जिल्ह्यातील आजच्या अहवालानुसार आलेली आकडेवारी गेल्या महिन्याभरात आलेली सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!