राज्यात 6400 नवे कोरोना बाधित ; ६५ जणांचा मृत्यू

18 लाख 2 हजार कोरोना रुग्णांची संख्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गुरुवारी राज्यात ६ हजार ४०६ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. तर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 2 हजारांवर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून खाली येताना दिसत होता. परंतु गेल्या दिवाळी होताच, काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

गुरूवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर ६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ४ हजार ८१५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ जणांनी करोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ९६३ अॅक्टिव केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!