24 तासांत 59 हजार 907 नवीन रुग्ण : 322 मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया


राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यावरून राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.

नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.


मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!