गेल्या 24 तासांत 40 हजार 414 नवे रुग्ण : 108 मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील गेल्या 24 तासांतील तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 71 लाख 3 हजार 875 झाली आहे. त्यातील 2 कोटी 33 लाख 2 हजार 453 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई :- मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 6 हजार 923 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 380 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे :- पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

नाशिक :- नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नाशिकमध्ये आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 310 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 755 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!