राज्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात गेल्या 8 दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे आशादायक चित्र आहे. मंगळवारी पुन्हा राज्यात नवीन कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या सुमारे 5 हजारांनी अधीक होती. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी जास्त असल्याचं समोर आलं आहे. मागील २४ तासांमध्ये १२ हजार ९५८ नवे करोना रुग्ण राज्यात आढळले आहेत. तर १७ हजार १४१ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १४ लाख ६५ हजार ९११ इतकी झाली आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन ३८ हजार ७१७ मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत ११ लाख ७९ हजा ७२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला २ लाख ४७ हजार २३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!