संचारबंदी अंमलबजावणी वर प्रशासन ठाम ?

व्यापारी व नागरिकांनी सूचनेचे पालन करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आवाहन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील रुग्णसंख्या कमी असल्याने शहरात संचारबंदी लावू नये अशी मागणी सर्व स्तरावर होत असली तरीही जिल्हा प्रशासन संचारबंदी वर ठाम असल्याचे दिसते आहे. गल्ली पासून ते मुंबईपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याबाबत लोक आणि प्रतिनिधी आग्रही असताना बुधवारी प्रशासनाने पंढरपूर मध्ये बैठक घेऊन संचारबंदी अंमलबजावणी बाबत नियोजन केले आहे. दरम्यान, काल आरोग्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून संचारबंदी बाबत फेरआढावा घेण्याची सूचना केली असून आज काय निर्णय होतो याकडे ही नागरिकचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काल ( दि.11 रोजी ) येथील सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय येथे कोरोना निर्बंधाबाबत  तालुक्यातील पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर तसेच पदाधिकारी, व्यापारी, नागरिक आदी उपस्थित होते.

यावेळी सोलापूर  जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा पाच तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  निर्बंध  आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी बुधवारच्या बैठकीत व्यापाऱ्यांना केले.

    सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा  तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाच्या पहिल्या  व दुसऱ्या लाटेचा  परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला होता.संभाव्य येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.  प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये  तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून  फौजदारी  प्रक्रिया संहिता 73 चे कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्यात आले  असल्याचे  अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव  यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.जाधव यांनी सांगितले. 

 कोरोना संसर्गाच्या  पाहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत  जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी  प्रशासनास सहकार्य केले आहे. सध्या काही ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती रुग्ण संख्या तसेच  संभाव्य येणारी तीसरी लाट पाहता प्रशासनास प्रतिबंधात्मक  कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने ‍दिलेल्या सूचनाचे पालन करावे, अशा सूचना अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल  झेंडे यांनी दिल्या.

 यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची तसेच रॅपिड अँटीजेन  तपासणी व लसीकरणाबाबत माहिती दिली. यावेळी ढरपूर शहर व ग्रामीण भागाबाबत वेगळा निर्णय घ्यावा, वेळ वाढवावा तसेच कर माफ करावा आदी मागण्या यावेळी  व्यापाऱ्यांनी मांडल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!