करोना अफवा : सायबर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबई : ईगल आय मीडिया

करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर केला असताना समाजमाध्यमांवर अफवांची लाटही वेगाने पसरू लागली आहे.
करोनाविषयक खोटय़ा बातम्या, खोडसाळ अथवा गैरसमज वाढवणाऱ्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले असून प्रसंगी धडक कारवाईही करण्यात येत आहे.

⭕ ‘सायबर महाराष्ट्र’च्या सूचना

अफवा पसरवू नका,
अफवेवर विश्वास ठेवू नका.

व्हॉट्सअ‍ॅपसह अन्य समाजमाध्यमांद्वारे प्राप्त झालेले साहित्य खातरजमा केल्याशिवाय जशास तसे पुढे पाठवू नका.


करोनाविषयक अफवा, संभ्रम निर्माण करणारे अर्धसत्य तपशील, फसवणुकीच्या योजना पसरवणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षी धडक कारवाई करण्यात आली होती. अशा व्यक्ती टिपून राज्यभर गुन्हे नोंद करण्यात आले होते. मधल्या काळात ही कारवाई थंड पडली होती.


मात्र दुसऱ्या लाटेत समाजमाध्यमांवर पुन्हा मोठय़ा प्रमाणावर अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती ‘सायबर महाराष्ट्र’चे प्रमुख यशस्वी यादव यांनी दिली. समाजमाध्यमांवरील प्रत्येक हालचाल, प्रसारित होणारा मजकूर काटेकोरपणे तपासला जात असल्याचे यादव यांनी सांगितले. तसेच फेसबुक, ट्विटर, गुगल आदी सेवा पुरावठादारांनाही अफवा, संभ्रम निर्माण करणारे साहित्य बाजूला काढण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अफवा, कायदा-सुव्यवस्था बाधित होईल असा मजकूर पसरवणाऱ्यांना आधी फौजदारी दंड संहितेतील कलम १४९ नुसार नोटीस बजावली जाईल. त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

error: Content is protected !!