म्हणून बीसीजी लस घेतली : खा.शरद पवार

खा. पवारांनी सांगितले त्यांच्या कोरोना प्रतिकार शक्तीचे गुपित

सिरमचे प्रमुख सायरस पुनावाला यांच्यासोबत खा.शरद पवार

टीम : ईगल आय मीडिया

“करोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली. तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घे, असे सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता” असे शरद पवार यांनी सांगितले.

आज अहमदनगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या शरद पवारांनी, आपण इतक्यात लस घेणार नसल्याचे सांगितले.


या संदर्भात अधिक बोलताना खा.पवार म्हनाले की, अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आग्रह धरला.

त्यावेळी मी त्यांना सांगितले की, “आता मी नगरला दोन खासगी रुग्णालयाच्या उद्घटनासाठी निघालो आहे. तिथे जाऊन परिस्थिती पाहतो. परिस्थिती गंभीर असेल, तर मुंबईला न जाता पुण्याला येऊन लसीचा डोस घेईन असे सांगितले.

आता इथे परिस्थिती पाहिली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मी लस घेण्यासाठी आता पुण्याला न जाता थेट मुंबईला जाणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!