शेतकऱ्याच्या नावावरती बोगस कर्ज काढून आमदारांनी शेतकऱ्यांचे केले सिविल खराब..

माढा : प्रतिनिधी
माढा शहरापासून मानेगाव जिल्हा परिषद गटाचा विकास जाणीवपूर्वक आमदार शिंदे यांनी केलेला नाही. या भागातून त्यांचे चिरंजीव यांनी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गेल्या 30 वर्षापासून माढा पूर्व भागातील विविध गावांना जोडणारे रस्ते शिक्षण, आरोग्य या समस्या आजही कायम आहेत, असा आरोप दादासाहेब साठे यांनी केला. माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या अधिकृत उमेदवार ॲड.मीनल साठे यांच्या प्रचारार्थ मानेगाव जिल्हा परिषद गटातील दारफळ या ठिकाणी प्रचार सभेत ते बोलत होते.
विरोधी दोन्ही उमेदवार यांचेकडून कारखान्याच्या उसाचा भाव शेतकऱ्यांना फुगवून सांगितला जातो. व उसाच्या दराखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यांचा तालुक्यातील केवड व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर या दोन्ही कारखान्याच्या दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येते. विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या नावावरती बोगस कर्ज काढून कारखाना चालवीत आहेत. या उलट आम्ही सहकार चळवळ टिकवण्यासाठी स्वतःच्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून शेतकऱ्यांची बिले देत आहोत, हा फरक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि मीनल साठे यांच्या घड्याळ या चित्रासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन दादासाहेब साठे यांनी मतदारांना केले.
पुढे बोलताना साठे म्हणाले कि, केवड येथील त्यांच्या कारखान्याच्या नावाखाली त्यांच्या शेतीसाठी सिना नदीतून मोठ्या प्रमाणावर बेसुमार पाणी उपसा केला जातो. त्यामुळे या ठिकाणची शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून ची मागणी आहे की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आठ तास वीज आहे, त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा आठ तास या उंदरगाव बंधाऱ्यातून पाणी उपसा करावा. बोगद्यातून सीना नदीला पाणी सुटल्यापासून वीस ते पंचवीस दिवसात या नदीचे पात्र कोरडे पडते. त्यांनी त्यांच्या आठ इंच पाईपलाईन व त्यांच्या पाहुणे रावळ्यांच्या ही मोटाऱ्यांना स्वतःच्या कारखान्याची वीज 24 तास वापरली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्या वाचून करपून जात आहेत.
या कॉर्नर सभेसाठी भाजपाचे माढा शहराध्यक्ष मदन मुंगळे, नगरसेवक सुधीर लंकेश्वर, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल रामलिंग शिंदे, जामगाव चे मधुकर चव्हाण,हौसाजी पाटील, सुरेश अधटराव, रमेश चव्हाण गुरुजी, औदुंबर उबाळे, बाळासाहेब पाटील, योगेश अजूरे, पिंटू होनराव, अवधूत चव्हाण, नितीन महाडिक ,चंद्रकांत बारबोले, सचिन उबाळे ,अजित गोडगे, साहेबराव बारबोले, दिनकर चव्हाण, संजय पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.