टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रात आज दिवसभरात राज्यात तब्बल 39 हजार 544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,12,980 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,00,727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत बाधितांचा आकडा 41 लाख 47 हजार 773 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3 लाख 52 हजार 163 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5970 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 39,692 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 64277 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8325 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 536262 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 463611 जण कोरोनामुक्त झाले आहेत.