कुटुंबाच्या रोगमुक्तीसाठी बालकाचा नरबळी देणाऱ्याचे विविध रोगांनी ग्रस्त अवस्थेत निधन !

आरोपी दामाजी सहकारी चा माजी संचालक नानासाहेब डोके याचे न्यायालयीन कोठडीत असताना निधन

टीम : ईगल आय मीडिया

21 व्या संगणक युगात, आधुनिक जगात असूनही धनप्राप्ती आणि कुटूंबाच्या रोगमुक्तीसाठी एका निष्पाप बालकाचा बळी घेऊन नरबळी देण्यासारखे अमानवी, अघोरी कृत्य करणारा दामाजी सहकारी साखर कारखान्याचा माजी संचालक असलेल्या नानासाहेब डोके याचे विविध रोगांनी ग्रस्त झालेल्या अवस्थेत न्यायालयीन कोठडीत असताना बुधवारी निधन झाले.

माचनूर (ता.मंगळवेढा, जि. सोलापूर ) येथील प्रतीक शिवशरण या 9 वर्षीय बालकाचे 26 ऑक्टोबर 2018 रोजी अपहरण करून नरबळी दिल्याचा आरोप नानासाहेब डोके याच्यावर होता. आणि त्याच आरोपात सुमारे अडीच वर्षांपासून तो न्यायालयीन कोठडीत होता. प्रतीक शिवशरण या बालकाचे अपहरण आणि खून हे प्रकरण राज्यभरात गाजले होते.

प्रतीक शिवशरण या बालकाचा अपहरण करून नरबळीच्या नावाखाली खून केल्याचे पोलिस तपासा वेळी निष्पन्न झाल्याने 12 जानेवारी 2019 रोजी पोलिसांनी नानासाहेब डोके यास अटक केली होती.

न्यायालयाने 4 वेळा डोके याचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि विविध आजारांनी ग्रस्त झालेल्या डोके याचे पुण्यात ससून रुग्णालयात बुधवारी उपचार सुरू असताना निधन झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!