दत्त विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ

फोटो
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेताना सुस्ते येथील श्री दत्त विद्यामंदिरमधील विद्यार्थी आणि शिक्षक

प्रतिनिधी : पंढरपूर

सुस्ते ता. पंढरपूर येथील दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथील  विद्यार्थ्यांनी यंदा प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.  प्रदूषण मुक्त दिवाळी अभियानांतर्गत, प्रशालेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी  सर्व शिक्षकांसमवेत पर्यावरण रक्षणासाठी  फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक  शपथ घेतली.


यावेळी विद्यार्थ्यांना  ध्वनी, वायू प्रदुषण करणारे, श्वसन संस्थेचे आजार निर्माण करणारे व सजीवसृष्टीला हानीकारक असणारे फटाके न फोडण्याबद्दल विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. तसेच प्रशालेत काढलेल्या   विविध घोषवाक्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.  तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेल्या प्रतिज्ञेचे पालन करण्याचे अभिवचन दिले.


यावेळी प्रशालेचे प्राचार्य आर.डी शिनगारे, पर्यवेक्षक ए.एम बनसोडे, एस.जे कट्टे, एस.पी फडतरे, व्ही.एस दराडे, ए.ए पवार, डी.एस भाजीभाकरे, आर.एम जाधव, डी.ए वाघ, एन.एम वायदंडे, एम.व्ही देशमुख, पी.पी गावडे, एस.के चव्हाण, एस.व्ही चंदनशिवे, जी.के पाटील ,एस.एस खूपसे, जी.एस खिलारे, वरिष्ठ लिपिक आर.डी ढगे, के.डी बोधले ,एस.एच मोरे, व्ही.एस म्हेत्रे, एस.एस इंगळे, पी.व्ही जावीर, एस.सी निंबाळकर, एस.आर देवकर, बी.जे पवार, बी.एस बनसोडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!