दत्तात्रय मागाडे यांचे निधन

पत्रकार बाळासाहेब मागाडे
यांना पितृशोक

टीम : ईगल आय न्यूज

जवळा ता.सांगोला येथील दत्तात्रय रामचंद्र मागाडे (भाऊसाहेब) यांचे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार डॉ. बाळासाहेब मागाडे यांचे ते वडील होत.

सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली होती. सेवा निवृत्तीनंतर जवळा गावात त्यांनी खादी ग्रामोद्योग व्यवसाय उभा करून महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वदेशी कापडाची निर्मिती सुरू केली होती. हातमागावर कापड निर्मितीचा जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प त्यांनी सुरू केला.

Leave a Reply

error: Content is protected !!