उजनीचा विसर्ग 30 हजार : तर दौंडची आवक 20 हजार क्यूसेक्स

धरणाची पाणी पातळी 104 टक्के : पूरस्थिती नियंत्रित

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे उजनीत येणारा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स पर्यंत वाढला असला तरी उजनी धरणातील पाणी साठा 104 टक्के पर्यंत कमी केला आहे. त्यामुळेच सोमवारी 50 हजार क्यूसेक्स चा असलेला विसर्ग मंगळवारी सकाळी 8 वाजता 30 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी करण्यात आला आहे.

उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी नियंत्रणात असावे यासाठी उशिरा शहाणपण सुचलेल्या धरण प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत धरणातून 50 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी उजनीचा पाणी साठा 104.69टक्के इतका झाला आहे.

पुढच्या 4 दिवसांत हवामान खात्याने मोठ्या पावसाचा ईशारा दिल्याने धरणातील पाणी साठा कमी केला असल्याचे दिसते. दोन दिवसात पूणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने उजनीत येणारा विसर्ग 20 हजार 572 क्यूसेक्स पर्यंत गेला असला तरी धरणातून 30 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत असल्याने भीमेची पाणी पातळी नियंत्रित राहणार आहे. बंडगार्डन येथे 8 हजार 436 क्यूसेक्स इतका विसर्ग येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!