साखर कारखानदारी आणि ऑक्सिजन प्रकल्प बाबत झाली चर्चा

पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ना. अजित पवार यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट आणि साखर कारखानदारी याबाबत चर्चा केली.
चोराखळी ( ता.उस्मानाबाद ) येथील धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्रकल्प उदघाटन व्हर्च्युअल प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव साखर साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना भेटण्याचे निमंत्रण दिले होते. नियोजित वेळेत आज मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री पावर यांची अभिजित पाटील यांनी आज भेट घेतली.
यावेळी धाराशिव साखर कारखान्यावरील ऑक्सिजन प्रकल्पाची संपुर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेऊन राज्यातील इतर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत चर्चा केली. व राज्याची ऑक्सिजन मागणीनुसार साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती पुर्ण होऊ शकेल यावर सविस्तर चर्चा चेअरमन अभिजीत पाटील यांची झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.