दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : उपमुख्यमंत्री पवार

लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात नाराज व्यापाऱ्यांसोबत घेतली बैठक 

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अनेक ठिकाणी भयावह परिस्थती आहे. एकाच सरणावर 10-10 लोकांचा अंत्यविधी केला जात आहे. त्यामुळे हा वाढणारा संसर्ग थांबविण्यासाठी राज्यसरकार निर्बंध घालत आहे. त्याला व्यापाऱ्यांनी  सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र राज्य सरकार व्यापाऱ्यांसोबत असून येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पोटनिवडणूक प्रचारासाठी पंढरपुर मध्ये आले आहेत. राज्यात वाढत आसलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे  निर्बंध कडक करीत काही सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी नागरिक नाराज आहेत, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरीत येताच नाराज व्यापाऱ्यांसोबत कल्याणराव काळे यांच्या निवस्थानी बैठक घेत रुसवा काढण्याचा प्रयत्न केला.

     कल्याणराव काळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत  व्यापाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. राज्यात निवडणुका होत आहेत, अनेक ठिकाणी खुलेआम गर्दी होत असताना केवळ लहान मोठे उद्योग- व्यवसाय बंद करून त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे सांगितले. तर हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला सकाळी 9 ते रात्री 10 पर्यत फक्त पार्सल साठी परवानगी द्यावी, तर इतर व्यावसायिकांनी काहीही अटी घाला मात्र लोकडाऊन नको, त्यामुळे मोठे नुकसान होत असून अनेक कामगार, लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला.

 यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी प्रतिनिधीच्या तक्रारी एकूण घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याबत व्यापाऱ्यांना निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!