भारतनानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा !

नंदेश्वर येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

शरद पवार यांनी पक्ष न पाहता सगळ्यांना मदत केली, म्हणून आज महाविकास आघाडीकडे पाठिंबा वाढत आहे. वाढप्या ओळखीचा असल्यास ताटात जास्त पडते. नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी 
 भगीरथला विधानसभेत पाठवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नदेश्वर येथील प्रचार सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ संजय मामा शिंदे, उत्तम जानकर, दीपक साळुंखे, उमेश पाटील, सुरेश घुले, कल्याणराव काळे, अनिल सावन्त, लतीफ तांबोळी, भारत बेदरे, शिवाजीराव काळूगे, जयमाला गायकवाड, सरपंच सजाबाई लवटे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

  उपसा सिंचन योजने संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 10 कोटी टोकन निधी मंजूर केला आहे. वर्षात चार वेळा पुरवणी बजेट मला देता येते. या एका निवडनूकीवर भागत नाही, आम्हाला कायम तुमच्या सोबत राहायचं आहे. दोन टीएमसी पाणी परत मंजूर केले. वगळण्यात आलेली गावे समाविष्ट केली आहेत. 42 हजार एकरला पाणी मिळणार आहे, कोणीतरी येतात भूलथापा मारतात आपण कोणी गैरसमज करून घेऊ नका असे आवाहन केले.


या वेळी बोलताना अजित पवार यांनी, बसवेश्वर स्मारक निधी मंजूर केला आहे लवकरच उभा करू सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भगीरथला विधानसभेत पाठवा. स्वतःच्या जीवाची काळजी न घेतल्याने नाना आज आपल्यात नाहीत त्यांचे कार्य पूर्ण करू असे शेवटी सांगितले.


पालकमंत्री भरणे यांनी या वेळी, पोटनिवडणुकीसाठी मतदान करत असताना मतदारसंघात असलेल्या समस्या आणि कामे मार्गी लावण्यासाठी आ.भारत भालके सतत जयंत पाटील यांना भांडायचे हे मी पाहत आलो. पण त्यांची अपूर्ण स्वप्ने साकार करण्यासाठी भगीरथ ला पाठिंबा द्या असे आवाहन केले. तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ता मागितलेल्या भाजपला कधीही आरक्षण द्यावे वाटले नाही. समाजावर अन्याय केला. आता पोटनिवडणुकीत याच मुद्द्यावर अजून मते मागत आहेत. मात्र महाविकास आघाडी हे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले.


उमेदवार भगीरथ भालके यांनी नाना नी पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करूनच दाखवली, असे सांगत राहिलेली सर्व अपुरी कामे महाविकास आघाडीच्या ताकदीवर पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.


उत्तम जानकर यांनी बोलताना, आमच्यासारखे पुढारी हे मदत म्हणून दोन पैसे देऊ शकतात, नोकरी लावतील, मान सन्मान देतील, पण आ. भालके यांनी मतदारसंघासाठी जीव दिला आहे. हे न विसरता त्यांचे हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही असे सांगितले. यावेळी पांडुरंग चौगुले यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन भारत बेदरे यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!