उपमुख्यमंत्री अजित पवार वाड्यावर जाणार

पवार – परिचारक स्नेह जपण्याचा प्रयत्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपूर तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले असता माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिचारक कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.

मागील महिन्यात जेष्ठ नेते खा शरद पवार यांनीही वाड्यावर जाऊन पंतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर दौऱ्यावर येत असताना त्यांनी भोसे येथे जाऊन कै राजूबापू पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले.

त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ना. पवार हे पंतांच्या वाड्यावर जाऊन परिचारक कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सध्या परिचारक कुटुंब जरी भाजपात असले तरी पवार आणि परिचारक कुटुंबातील व्यक्तिगत स्नेह जपला असल्याचे या भेटीतून दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!