कोणत्या संकेत स्थळावर आणि कसा पहाल आपला निकाल ?
पंढरपूर : eagle eye news
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, २१ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Higher Secondary Certificate) परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
या अधिकृत संकेतस्थळावर पहा इयत्ता १२ विचा निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
http://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ ही परीक्षा घेण्यात आली होती.
शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. मंगळवार दिनांक २१/०५/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता १२ वी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.
असा पहा आपला १२ विचा निकाल
१)सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट maharesult.nic.in किंवा वर देण्यात आलेल्या वेबसाईट्सवर जा.
२) होमपेजवर Results पेजवर क्लिक करा.
३)महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२४ या लिंकवर क्लिक करा.
४)लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
५) बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
६) आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.