देगावात दारूबंदीचा ठराव

महिलांचा पुढाकार : तळीरामांचा उच्छाद

टीम : ईगल आय न्यूज
देगांव ( ता. पंढरपूर ) ग्रा.पं.च्या ग्रामसभेत मावा व अवैध दारू बंदीचा ठराव करण्यात  आला.  दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला  असून दारूमुळे  घरात महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत  आहे.  त्यामुळे  महिलांनी दारुबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
     

 गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात अनेक गावात अवैध दारू विक्री पुन्हा वाढायला लागली आहे. देगाव मध्ये  पाच ते सहा ठिकाणी अवैध दारू विक्री होत  आहे.  रोजच्या भांडणाला कंटाळून, दारूमुळे कुटुंबाचे नुकसान होत असल्याने गावातील १०० पेक्षा अधिक महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच  ग्रामसभेत ठराव करन्यात  आला आहे.  गावात  दारूबंदी व तंबाखूजन्य मावा विक्री बंदी न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा या महिलांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक याप्रकरणी कठोर कारवाई करणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!