दिल्लीतील आंदोलनास १०० दिवस पुर्ण

टीम : ईगल आय मीडिया


केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेले काळे कायदे रद्द करावेत व किमान हमी भाव कायदा अस्तित्वात आणला पाहिजे, यासाठी देशभरातील शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास 100 दिवस पूर्ण झाले. यानिमित्ताने केंद्र सरकारने दखल घेतली नाही म्हणून सरकारच्या निषेधार्थ आज काळा दिवस साजरा करण्याचे तसेेेच राज्यातील शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे सदस्य संदीप गिड्डे पाटील यांनी केले आहे.


संदीप गिड्डे पाटील देखील सध्या १०० दिवसांपासून दिल्लीतील आंदोलनात सहभागी आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गाजीपूर बॉर्डर येथे विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.


जुलमी केंद्र सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल न घेता हे आंदोलन बदनाम करणे, फुट पाडणे, पोलिसी दबावतंत्र वापरणे यासारखी अनेक षडयंत्रे रचली मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दिल्लीत गेल्या १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.


शेतकऱ्यांनी एकजुटीने सर्व संकटांवर मात करून महापंचायतीच्या रूपाने या आंदोलनाचे स्वरूप आणखी व्यापक केले आहे.
१०० दिवस झाले तरी केंद्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही याचा निषेध करण्यासाठी दि.६ मार्च रोजी देशभरातील शेतकरी एक दिवस घरावर काळा झेंडा, काळी फीत किंवा वाहनावर काळा झेंडा लावून निषेध करणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!