स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मागणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कांद्याला मागील काही दिवसात थोडा दर वाढला म्हणून केंद्र शासनाने तुघलकी पद्धतीने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.या संदर्भात स्वाभिमानीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, यंदा उन्हाळी हंगामात कोरोना मुळे दोन ते चार रुपये भावाने कांदा विकला जात असताना कुठलीही संवेदनशीलता केंद्र सरकारने दाखवली नाही. मात्र कांद्याचे दर वाढताच दोन दिवसापूर्वी निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
सर्वसामान्य माणसांना दिलासाच देयचा असेल तर तर सरकारने पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावेत शेतकऱ्यांना मातीखाली गाडण्याचे काम शासनाने करु नये व तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी निवसी उपजिल्हाधिकारी आजित देशमुख यांना निवेदन दिले आहे.
कांदा निर्यात बंदचा निर्णय मागे न घेतल्यास संपुर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा असंतोष उफाळेल त्यासाठी स्वाभीमानी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळेस देण्यात आला.