संत पेठेतील तो मुर्ती कारखाना बंद करण्याची मागणी

फोटो : मागणीचे निवेदन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकार यांना देताना सागर चव्हाण व इतर.

पंढरपूर : ईगल आय न्यूज
 येथील संतपेठ परिसरामध्ये असणारा अवैध मुर्ती कारखाना बदं करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. या मागणीची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा पंढरपूर नगरपालिकेसमारे हालगीनाद आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या मराठा युवा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


येथील संत पेठ परिसरामध्ये असलेल्या कारखान्यामध्ये मुर्ती बनविताना मोठा धुरळा उडत असल्याने  प्रदुषण होत आहे.  तर मुर्ती बनविण्यासाठी चालविण्यात येणार्‍या मशीनमुळे ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचाहि त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागात आहे.


 यामुळे हा कारखाना बंद करण्याच्या मागणीसाठी नगरपालिका प्रशासनास यापूर्वी ही निवेदन दिले आहे  परंतु यावर प्रशासनाने कोणतीहि कारवाई केली नाहि. त्यामुळे त्वरीत हा अवैध मुर्ती कारखाना बंद करावा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने दि 17 रोजी नगरपालिके समोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल. असा इशाराहि  देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!