उपशिक्षणाधिकारी गौरी धायगुडे बनल्या तहसीलदार

सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते गौरव

सोलापूर : ईगल आय मीडिया

जिल्हा परिषदे शिक्षण विभागात कार्यरत उप शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असणारे गौरी धायगुडे यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. महिलांनी सर्व क्षेत्रात नाव कमवावे. मला पण दोन मुली आहेत. माझ्या मुली माझा अभिमान आहेत. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.


जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे आरोग्य व उपवास , महिलांचे अधिकार व महिलांची सुरक्षितता या बाबत चर्चा सत्राचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी गौरी यशवंत धायगुडे यांची तहसीलदार पदी निवड झाले बद्दल सत्कार करणेत आला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , प्रकल्प अधिकारी जावेद शेख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि प सदस्य रेखा राऊत, जि प सदस्य मंजुषा कोळेकर, जि प सदस्य स्वाती कांबळे, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,आहार तज्ञ डॉ सोनाली घोंगडे, उमेद अभियानाच्या मिनाक्षी मडीवळे, सखी सेंटरच्या सुवर्णा गाडेकर व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!