जिंदादिल भारतनानांच्या निधनाने समाजाचे नुकसान : देवेंद्र फडणवीस

सरकोलीत देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आ. भारत भालके यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारत नाना भालके हे जमीनीवर असणारे नेते होते, ते अशा प्रकारे जातील असे वाटत नव्हते,कुणाचाही यावर विश्वास बसत नाही. जिंदादिल भारत नानांच्या निधनाने समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आ. भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

vdo पहा

तसेच यावेळी भालके कुटुंबियांचे सांत्वन ही केले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस हे आज दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सरकोली येथे आले होते. आज दुपारी 1 वाजता फडणवीस हे विमानाणे पुणे येथे आले होते, तिथून मोटारीने नीरा नरसिंहपूर येथे गेले आणि नरसिंहाचे दर्शन घेतले.

सायंकाळी साडे सहा वाजता आम. भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेन्यासाठी सरकोली येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी .बोलताना फडणवीस म्हणाले की, भारत नाना हे राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जोडणारे नेते होते, त्यांच्या निधनाने भालके कुटुंबियांचे तर नुकसान झालेच आहे मात्र समाजाचे ही नुकसान झाले आहे.

यावेळी माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!