विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोरोना चा आढावा
टीम : ईगल आय मीडिया
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकार्यांकडून कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना जाणून घेतल्या.
गडचिरोलीचा संसर्ग दर हा 20 टक्क्यांच्या वर आहे. प्रारंभीच्या काळात काही समस्या होत्या. पण, आता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. बेड्स आणि ऑक्सिजनची सध्या उपलब्धता आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत मोठे आव्हान हे लसीकरणाचे आहे.
आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचा काहींचा प्रयत्न. त्यावर जिल्हाधिकार्यांना काही उपाययोजना सूचविल्या. आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा यात योगदान देत आहेत. जेथे संभ्रम आहे, तेथे कार्यकर्त्यांनी आधी पुढे यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव राज्य सरकारने लवकर केंद्र सरकारकडे पाठविला, तर केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू आणि त्यादृष्टीने गतीने पाऊले पडतील. खा. अशोक नेते यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.