शासकीय निधीसह राजाभाऊ खरे यांच्या स्वखर्चातील कामांचे भूमिपूजन
पंढरपूर : प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा गेल्या ७५ वर्षांचा विकासाचा बॅक लॉग पुढच्या पाच वर्षात भरून काढला जाईल, मूलभूत सुविधांसह आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उद्योजक राजभाऊ खरे यांनी दिली. औंढी आणि वरकुटे या दोन्ही गावात राजाभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या १ कोटी २५ लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि खरे यांच्या स्वनिधितून २५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
राजाभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयाच्या शासकीय निधीसह स्वखर्चातून सुरू करण्यात आलेल्या विविध कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
यामध्ये मोहोळ तालुक्यातील औंढी गावातील गणू पाटील वस्ती ते फराटे, भुसे, गुंड, चव्हाण, वस्तीकडे जाणारे ५० लाख रुपये किमतीचे पानंद रस्ते, फराटे वस्ती ते भुसे, पाटील, वस्तीकडे २५ लाख रुपयाचे खडीकरण रस्ते,औंढी ते भुसे,पाच चावर वस्ती १५ लाखाचे खडीकरण, औंढी ते बेगमपुर रस्त्यावर गुंड, माने, शिंदेवस्ती रस्त्याच्या खडीकरणसाठी १५ लाख, गणू पाटील वस्ती ते शिंदे, भुसेवस्ती या रस्तासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ,उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील विविध गावातून विकास कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी औंढी आणि वरकुटे या गावातील विविध कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
या वरील सरकारी निधी बरोबर राजाभाऊ खरे यांच्या स्वनिधीतून औंढी येथील भजनी मंडळास भजनी साहित्य, वरकुटे येथील मारुती मंदिर समोर फेव्हर ब्लॉक, वरकुटे येथील मेन रोड ते ससाणे वस्ती रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले असून याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
या शुभारंभ प्रसंगी पांडुरंग बचूटे, सौदागर खडके, सरपंच अरुण बनसोडे, संभाजी लेंगरे, लिंगराज व्हनमाने, सुनील पाटील, सौदागर डोंगरे,नाना भुसे, तानाजी शिंदे, सागर भुसे, नितीन कांबळे, सोसायटीचे चेअरमन संभाजी शिंदे, विजयकुमार भुसे, राजेंद्र भुसे, औदुंबर शिंदे, अर्जुन शिंदे, आकाश बचूटे, विश्वतेज बचूटे, लखन घाटे, गणेश सोनवणे यांचेसह मोहोळ मतदार संघातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, यांचेसह विविध संस्थांनचे पदाधिकारी उपस्थित होते.