धनगर समाज राष्ट्रवादी च्या पाठीशी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भगीरथ भालके भाजपवर भारी पडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाने या निवडणुकीत ही राष्ट्रवादी च्या मागे आपली राजकीय ताकद उभा केल्याचे दिसून आले. भाजपने या मतांसाठी आम.गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केले मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि भारत भालके यांच्या पाठोपाठ हा समाज आपल्या2 सोबत कायम ठेवण्यात भागीरथ भालके यांनाही यश आले. भरणे -भालके भाजपवर भारी ठरले असेच यावरून दिसून येते.

नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये धनगर समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे निकालानंतर दिसून आले आहे . पंढरपूर शहर, तालुक्यातील कोर्टी, वाखरी, तपकिरी शेटफळ, तणाळी, बोहाळी, खर्डी, लक्ष्मी टाकळी, कासेगाव,तावशी आदी गावात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. यातील वाखरी, कोर्टी, कासेगाव, बोहाळी आदी गावात राष्ट्रवादीला तर तपकीर शेटफळ, गोपाळपूर, खर्डी, उंबरगाव, तणाळी, शिरगाव आदी गावात भाजपला लीड मिळाले आहे.


नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीसाठी धनगर समाजाचे मतदान आपल्या पदरात पडावे यासाठी राष्ट्रवादीकडून पालकमंत्री दत्तात्रय भरणे तर भारतीय जनता पार्टी कडून आ. गोपीचंद पडळकर यांचा प्रभावी वापर करण्यात आला. तालुक्यांमध्ये बहुतांश गावात धनगर समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. अशा सुुुमारेे 40 गावा पैैकी 30 गावात रााष्ट्रवादी ला लीड आहे.

त्यामध्ये पडोळकरवाडी, लोणार, ममदाबाद हु.,रेवेवाडी, हुन्नूर, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, रड्डे , भोसे, जालीहाळ, निंबोणी, हुलजंती, हजापूर, मेटकरवाडी, जुनोनी, खुपसंगी, गोणेवाडी, खोमनाळ, अरळी, येड्राव , खवे , सिद्धापूर, तांडोर, बठाण, उचेठाण, मुढवी, तळसंगी, मरवडे,नंदेश्वर या गावातील धनगर समाजाने भगिरथ भालके यांना साथ दिली आहे.

तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या पाठीशी
मंगळवेढा शहर, मानेवाडी, लवंगी, सलगर खुर्द, शिवनगी, येळगी, बावची, जित्ती, पाठखळ, मुंढेवाडी डोंगरगाव, हिवरगाव या गावातील मतदार राहिल्याचे दिसून आले.


भाजपसाठी माजी सभापती प्रदीप खांडेकर सलगर खुर्द येथे विठ्ठल सलगर, अमोल माने तर भगीरथ भालके यांना तानाजी खरात (मुढवी) जगन्नाथ रेवे (रेवेवाडी) सुरेश कोळेकर (रड्डे), रामेश्वर मासाळ (गोणेवाडी ), ईश्वर गडदे , दादासाहेब दोलतडे , माजी उपसभाापती दादा गरांडे, भारत मासाळ अशा विविध गावातील प्रमुख पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी केली. त्यामुळे धनगर समाज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे झुकल्याचे गावागावातून दिसून आले.

2009 सालापासून मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात भारत भालके यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. भाजपने अगोदर महादेव जानकर आणि आता गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून ही वोट बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र 2009, 2014, 2019 आणि 2021 च्या निवडणुकीत ही धनगर समाज भारत भालके आणि राष्ट्रवादी च्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!