धाराशिव साखर कारखान्याने देशात देशात नाव केले

ऑक्सिजन प्रकल्पाबाबत dvp उद्योग समूहावर कौतुकाचा वर्षाव

टीम : ईगल आय मीडिया

Dvp उद्योग समूहाच्या धाराशिव शुगरने ऑक्सिजन निर्मित करून राज्यातील साखर कारखानदारीचे देशात नाव केले आहे. दररोज 96 टक्के शुद्धता असलेल्या 6 टन ऑक्सिजन ची निर्मिती या कारखान्याने केवळ 18 दिवसांत सुरू केली आहे. आज ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे online उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी dvp उद्योग समूहाचे आणि चेअरमन अभिजित पाटील यांचे कौतुक केले.

याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील, आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे, उस्मानाबाद पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख, खासदास श्री.ओमराजे निंबाळकर, आमदार श्री.सुभाष बापू देशमुख, आमदार श्री. कैलास पाटील,  शिखर बॅकेचे चेअरमन श्री. विद्याधर आनासकर, सदस्य श्री.अविनाश महागांवकर,  जिल्हाधिकरी श्री.कौस्तुभ दिवेगावकर,VSI चे एस.व्ही.पाटील, मौज इंजिनिअरिंगचे ओक, कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित व्हर्चुअल पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला.


देश कोरोनाच्या अडचणीचा सामना करत असताना, पुढची लाट देशाच्या उंभरट्यावर आली असताना केवळ ऑक्सिजन हेच कोरोना वरील औषध आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याने “मिशन ऑक्सिजन” चालू केले आहे.त्यात चेअरमन श्री.अभिजीत पाटील या तरुणाने मैलाचा दगड ठेवला आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे. आपल्या धाराशिव साखर कारखान्याचे नुकसान करून ऑक्सिजन निर्मिती केली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारखान्याच्या सर्व सहकारी टीमचं मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच श्री.अभिजीत पाटील यांनी येणाऱ्या काळात सर्व कारखानदाराना मार्गदर्शन करावे; आपण सर्व मिळून या परिस्थितीचा सामना नक्की करू असा विश्वास दिला.

मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरेसाहेब

चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला यासाठी लागणारे सर्व सामग्री त्यांनी १८दिवसा त पूर्ण करून दाखवली त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. साखर कारखानदारी अडचणीत आली असताना देखील श्री. अभिजीत पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हेतर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल. सर्व देशवासियांच्या वतीने खुप खुप त्याचं आभार मानतो. केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी

ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला धाराशिव साखर कारखाने पहिली बाजी मारली यासाठी ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहेत ३हजार मेट्रिक टन महाराष्ट्राचे उद्दिष्ट असून अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन करावं व इतर कारखान्याने त्यांची प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्यात हा महत्व महत्वकांक्षी यशस्वी प्रयोग प्रयोग श्री.अभिजीत पाटील यांचा झालेला आहे.ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या त्या वेळी शेतकरी व शेतकऱ्यांचा कारखाना व शेतकऱ्यांची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात. हे आज श्री.अभिजीत पाटील यांच्या रूपात ना आज आपल्याला सर्वांसमोर दिसून आलेला आहे. श्री.अभिजीत पाटील यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

आज इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. देश महाभयंकर संकटाचा मुकाबला करत असताना धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.ते महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे या प्रयोगाचे सर्व कारखानदारांनी अनुकरण करावे मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो.

आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे


उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या ह्या देशातील पहिल्या इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने  माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, तसेच अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व सहका-याने दिवसरात्र मेहनत करून केवळ १८दिवसात हा प्रकल्प उभा केला पालकमंत्री शंकरराव गडाख यानी अभिनंदन केेलेे.

उस्मानाबाद जिल्हाचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान आज ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं उदघाटन करताना वाटलं आहे खासदार निंबाळकर म्हणाले.

ज्यावेळी सर्व कारखानदारांची VSI मध्ये बैठक झाली त्यावेळी देशाचे नेते आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांनी केलेल्या अवाहनानुसार पवारसाहेब त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हा प्रकल्प उभा करण्याचं धाडस दाखवलं. मी माझ्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून मौज इंजिनिअरिंग तसेच VSI च्या टेक्निकल सपोर्टमुळे व माझ्या संचालक मंडळ व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहका-यांने केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला.

चेअरमन अभिजीत पाटील

Leave a Reply

error: Content is protected !!