टीम : ईगल आय मीडिया
धुळे -नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली आहे.
यामध्ये पहिला निकाल धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचा आला आहे. यामध्ये भाजपचे अमरीश पटेल यांना 332 मते मिळाली आहेत तर विरोधी महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली तर 4 मते बाद झाली आहेत.
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी पुणे येथे सुरू झाली आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.