ग्लोबल गुरुजी डिसलेना कोरोनाची बाधा !

मुंबईहून परत येताच जाणवली लक्षणे, तपासणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह !

दोनच दिवसांपूर्वी डिसले गुरुजींचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला होता.


टीम : ईगल आय मीडिया।
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्काराचे यंदाचे मानकरी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोना बाधा झाली आहे. मुंबईत राज्यपाल,मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांना भेटून बार्शीत येताच त्यांना ताप आला रँपिड तपासणीत रिपोर्ट पाँझिटीव्ह आला आहे.

कोविड पॉझिटिव्ह आल्याची माहिती देणारं डिसले गुरुजींचे व्हाट्स ap स्टेटस


त्यामुळे खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. डिसले गुरुजींच्या सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. याशिवाय बाकी त्यांचे कुटुंबीय होते त्यांची रँपिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 8 दिवसांपूर्वी डिसले गुरुजींना जागतिक पातळीवरील ग्लोबल पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे गुरुजींवर सत्कार, शुभेच्छा यांचा वर्षाव सुरू आहे.

दररोज शेकडो लोक त्यांना भेट होते, त्यातच त्यांचा मुंबई दौरा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यपाल भगतसिंग कोशारी, मनसे प्रमुख राज ठाकरे , ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डिसले गुरुजींना सन्मानित केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

मुंबईहून परत येताच गुरुजींना सर्दी, ताप, थंडी अशी कोरोनाची लक्षणे दिसून येताच त्यांची तपासणी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!