अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र यांच्या सहयोगातून संशोधनास मोठी संधी

डॉ.इंद्रकांत बोरकर : संशोधक डॉ. बोरकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘उच्च व तंत्र शिक्षणामध्ये स्वेरी अगोदरच राज्यभर झेंडा फडकवीत आहे याची मला जाणीव आहे, पण आता स्वेरीतील संशोधनाची प्रत्यक्ष झेप पाहता संशोधन व इनोव्हेशन संस्कृतीमध्ये देखील स्वेरीने मोठी प्रगती केल्याचे दिसत आहे. भविष्यात स्वेरीतून अनेक शास्त्रज्ञ घडतील आणि अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र यांच्या सहयोगातून औषध संशोधनास मोठी संधी निर्माण होईल.’ असे भाकीत बेंगलोर येथील एलि लीली या बहुराष्ट्रीय कंपनी मधील संशोधक डॉ. इंद्रकांत बोरकर यांनी केले.


डॉ.इंद्रकांत बोरकर हे रविवाारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी तसेच तसेच रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी (आरएचआरडीएफ) ला प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली.

संशोधक डॉ. बोरकर पुढे म्हणाले की ‘पशुपालन आणि शेती यासाठी लागणारे नवीन जैवतंत्रज्ञान याबद्दल देखील संशोधन होणे गरजेचे आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसी या संशोधनामध्ये समन्वय साधला जाऊन योग्य ते संशोधन झाले पाहिजे. इंजिनीअरिंगमध्ये असलेला रियोमीटर हा औषधाच्या टेस्टिंगसाठी खूप उपयुक्त आहे हे सांगून संशोधनातील अनेक उदाहरणे दिली.


प्रारंभी संस्थेचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.संतोष साळुंखे, फार्मसीचे प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे, गोपाळपूरचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम आसबे यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!