डॉ धवलसिंह यांच्या निवडीने जिल्हा काँग्रेसला मिळणार उभारी ?

डॉ.धवलसिंह मोहिते – पाटील यांच्यासाठी पुढच्या निवडणूका आव्हानात्मक

टीम : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांची निवड करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटलांनकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा अली असून मोहिते पाटील गट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. तसेच याचा फायदा डॉ.धवलसिंह आणि काँग्रेस पक्ष या दोघांनाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर व जडणघडणीवर मोहिते-पाटील यांची पक्कड कायम आहे. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली होती. आता त्यांचे सुपुत्र डॉ धवल सिंह मोहिते – पाटील यांच्या हातात पक्षाचे धुरा आल्याने पक्षाला मोठी बळकटी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. प्रामुख्याने सोलापूर शहर सोडुन काँग्रेस पक्षाचे वर्चस्व व फारसे दिसुन येत नव्हते.

पंरतु डॉ धवल सिंह मोहिते-पाटील यांची कार्यकर्त्यांची फळी मोठी असल्याने गावो गाव ते वाड्या वस्त्या पर्यंत मोठी यंत्रणा आहे. याचा पक्षाला मोठा फायदा होणार असुन नुकताच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपंचायत व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक मध्ये कांग्रेस चा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही असे मानले जाते.


काँग्रेसचा विचार राज्यघटनेचं मूलभूत तत्वाशी आहे. हीच घटना देशाला पुढे नेणार. तो श्वाश्वत विचार आहे.सोलापूर जिल्हा मध्ये गावो गाव ते वाड्या वस्त्या पर्यंत काँगेस च्या विचारांची कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्राधान्याने काम करणार असुन . काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. काँग्रेसचा पडता काळ आहे का अशी चर्चा होती.परतुं काँग्रेस हा विचार आहे तो कोणीही संपवू शकत नाही. काँग्रेसची काम करण्याची पद्धत सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. ही विचारधारा आपल्या तत्वाशी बांधिल आहे. चांगले वाईट दिवस येत असतात. मुळाजवळ गेल्याशिवाय वाढ होत नाही, पक्षात काम करून पक्ष उभं करण्याचे काम करत.काँग्रेस विचाराला मानणारी तरुण पिढीची विचारधारा निर्माण करणार आहे. माझ्यावर प्रेम करणारी जनता ही माझी संपत्ती आहे.
डॉ.धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष.

सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते – पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तसा न्याय मिळाला नव्हता. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना गळाला लावलं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देतो म्हणा-या भाजप मोहिते-पाटील गटाला भाजपासाठी ही जागा कशीतरी निवडून आणली होती.

मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना दुर्लक्षित केल्याचे लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धवलसिंह मोहिते -पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील कार्यकर्त्यांची मोठी फळी असणारा तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने डॉ.धवलसिंह यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!