डॉ गेल अम्वेट यांची चळवळ पुढे चालू ठेवण्याचा निर्धार

पंढरपुरात श्रद्धांजली सभा संपन्न : विठोबा – रखुमाई मुक्ती आंदोलनातील सक्रिय आठवणींना उजाळा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामधून भारतात संशोधनासाठी येऊन येथील महापुरुषांच्या विचारांशी कायम घट्ट नाळ जोडत,  येथील शोषित, पीडित, महिला, कष्टकऱ्यांचा आवाज बनून राहिलेल्या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञा, लेखिका, समाजसेविका डॉ गेल अम्वेट ( शलाका पाटणकर ) यांच्या निधनामुळे साहित्य, चळवळ, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली चळवळ, कार्य यापुढे ही त्याच जोमाने पुढे सुरू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आसेल, असे मत रिपाईचे राज्यसचिव सुनील सर्वगोड यांनी व्यक्त केले.

  श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्या, समाजसेवक, आंतराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ डॉ गेल अम्वेट यांच नुकतेच निधन झाले. त्यांना पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटना, व सर्वपक्षीयाकडून जेठाबाई धर्मशाळेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जेष्ठ नेते सुनील सर्वगोड होते.

स्व गेल अम्वेट या 70 च्या दशकात महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावर पीएचडी करण्यासाठी भारतात येतात. आणि त्यानंतर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी एकरूप होऊन त्या महाराष्ट्राच्या शोषित, पीडित, महिला कष्टकऱ्यांचा आयुष्यभर आवाज बनून इथच राहतात. त्यांनी बुद्धांवर मोठे लेखन केले, तुकाराम महाराज अभंग इंग्रजीत भाषांतर ही केले आहे. मराठी सह विविध भाषेत त्यांनी तब्बल 30 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आसून  अनेक वंचीत घटकांना त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले.त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आसल्याचे मत साहित्यिक बा. ना.धांडोरे यांनी व्यक्त केले, तसेच डॉ.गेल यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी केली.  

यावेळी विठ्ठल – रुक्मिणी मुक्ती आंदोलनात त्यांचे पती व श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ भारत पाटणकर यांच्या सोबत स्व. शलाका पाटणकर यांनी नोंदविलेल्या सक्रिय सहभाग, तुकाराम महाराज, वारकरी सांप्रदाय यावर केलेल्या लिखाणासह इतर आठवणींना साहित्यिक सुधाकर कवडे यांनी उजाळा दिला.

          तर श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी रिपाई चे सुनील सर्वगोड, जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार, संतोष पाडोळे, सहकार शिरोमणी चे संचालक सुधाकर कवडे, रावसाहेब कसबे, किरण घाडगे, संदीप मांडवे, माऊली हळणवर, हभप ज्ञानेशवर महाराज बंडगर, सुनिल वाघमारे, श्रीकांत कसबे, समाधान गाजरे, पंकज देवकाते, रवि सर्वगोड, नागेश झेंडे, सुनिल गोळे, अंकुश शेम्बडे, राम जवळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!