आयुष्य भारत डॉक्टर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. पल्लवी माने

वामनराव माने प्रशालेत डॉ. पल्लवी माने यांचा सत्कार

फोटो ओळी
डॉ पल्लवी माने यांचा सत्कार करताना सरपंच सौ सीतादेवी सुभाष माने, सोबत उपस्थित ऍड. वामनराव माने, प्रा.  सुभाषराव माने व अन्य

पंढरपूर : eagle eye news
 भैरवनाथवाडी ( ता. पंढरपूर ) येथील वामनराव माने प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सोलापूर जिल्हा आयुष्य भारत डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी प्रतापसिंह माने यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल ईश्वर वठारच्या  सरपंच सौ.  सीतादेवी सुभाषराव माने यांच्या हस्ते डॉ. पल्लवी माने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वामनराव माने हे होते.

 सत्काराला उत्तर देताना डॉ पल्लवी माने यांनी,  आयुष्य भारत ही संघटना फिरते हॉस्पिटल. औषधावर संशोधन, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण संस्थेची उभारणी करणे व डॉक्टरांच्या समस्या, व विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचवता येतील असे सांगितले.

  यावेळी व्यासपीठावर जि प सदस्य तथा संस्थेचे सचिव सुभाषराव माने,संचालिका सौ सीतादेवी माने.  संचालक अगतराव तरंगे. चंद्रकांत देशमुख. डॉ प्रतापसिंह माने. उपसरपंच विजयसिंह माने. सौ अरुणाताई माने, सौ विमलताई माने. सौ संगीता कोकरे. प्राचार्य उत्तमराव लवटे. प्राचार्य उत्तम कोकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एम शिवशरण यांनी केले. आभार दत्तात्रय मस्के त्यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!