पंढरपूर ची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी

हीच भारत नाना यांना खरी श्रद्धांजली : छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दिवंगत आ. भारत नाना भालके यांनी शिवराज्याभिषेक असो, की मराठा आरक्षण असो सर्व सामाजिक चळवळीत मोठे योगदान दिले आहे. सर्व बहुजन समाजाच्या चळवळीचे ते आधार होते, त्यांचे निधन दुःखद असून पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, सर्वांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

सोमवारी ( आज दि. 28 ) सकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी सरकोली ( ता.पंढरपूर ) येथे जाऊन आ.भारत भालके यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आ.भारत नाना यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते. रायगडावर सुरू झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पहिल्यापासून मोठी मदत करणारे ते एकमेक आमदार आहेत. भगीरथ भालके यांना पुढच्या काळात काही अडचण आली तर आपण त्यांच्या पाठीशी उभा राहू. पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन सर्वांना केले आहे.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी भारत नानांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. भागीरथ भालके, व्यंकट भालके यांच्यासह भालके कुटुंबीय, दत्तात्रय भोसले, किरण घाडगे, प्रा.महादेव तळेकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!