नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई


उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांचा इशारा

पंढरपूर : ईगल आय मिडिया

  तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही  कोरोना रुग्णांची  संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिला आहे.

            तालुक्यात तसेच ग्रामीण भागात प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्या नागरिकाला बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरील नागरिकाला आत येता येणार नाही. याबाबत प्रतिबंधित क्षेत्रात नियम कडक राबविण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांनी नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा द्याव्यात जेणेकरुन अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही डॉ.कवडे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!