सुस्ते येथील 100 पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्यावतीने मदत

आपत्ती ग्रस्तांच्या पाल्याना कमवा व शिका योजने मधून सहकार्य करण्याचे डॉ. बी. पी. रोंगे यांचे आश्वासन



पंढरपूर : ईगल आय मीडिया

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सुस्ते (ता. पंढरपूर) गावावर संकट ओढवले आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सुस्ते येथील जवळपास 100 पुरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे दिसून येत आहे.


नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातले असून सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला आहे. प्रत्त्येक ठिकाणचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात डॉ. रोंगे सरांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान कार्य केले आहे.

प्रारंभी प्रास्ताविकात एड. विजयकुमार नागटिळक म्हणाले की, ‘डॉ. रोंगे सरांनी शिक्षण देत देत सामाजिक बांधिलकी देखील जोपासले आहे. भीमा नदीच्या पुरामुळे आपल्या गावाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील इलेक्ट्रीक मोटार, स्टार्टर, केबल जळून गेली, उभी पिके व माती वाहून गेली. पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. डॉ. रोंगे सरांनी थेट मदतीचा हात देऊन आपल्या गावातील शंभर पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्य, साखर, तांदूळ, चहा आदी साहित्याची मदत केली आहे.

यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘सुस्ते मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत धीरोदत्तपणे जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावे वाटते. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. विजय सालविठ्ठल, चंद्रकांत सालविठ्ठल, गणेश घाडगे, शरद लोकरे, विष्णू वाघमारे, योगेश चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विलास गायकवाड, पांडुरंग कदम, संतोष लोखंडे, अजिंक्य नागटिळक, भाऊ पैलवान, अनिल यादव, प्रसाद करपे यांच्यासह सुस्ते येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!