10 वी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

टीम : ईगल आय मीडिया

कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा   पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.


काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला.

अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

Leave a Reply

error: Content is protected !!