तालुकाभर विविध कार्यक्रम संपन्न : 502 जणांचे रक्तदान, वृक्षारोपण, नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पंढरपूर : ईगल आय मीडिया
Dvp उद्योग समूहाचे प्रमुख आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन श्री.अभिजीत धनंजय पाटील यांचा वाढदिवस तालुकाभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान असे अनेकांनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात आली.
पंढरपूरमध्ये कोरोना काळात रुग्णांना बेड्स मिळणे दुरापास्त झाल्याचे पाहून अभिजित पाटील यांनी dvp मल्टिप्लेक्स मध्ये कोविड सेंटर उभा केले.त्यातूनच तालुक्यातील कोविड बाधितांना कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा मिळाला होता. कोणत्याही प्रसंगात अग्रेसर असणाऱ्या अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. Dvp उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे.
काल १ ऑगस्ट रोजी अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिराची कुरोली, नांदोरे, देगाव, पंढरपूर याआदी गावात तसेच धाराशिव कारखाना युनिट१,२,३ मध्ये 502 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पळशी, पटवर्धन कुरोली, शेळवे, देगाव, शेळवे, अनवली, फुलचिंचोली आदी गावात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. महा आरोग्य तपसणी शिबीर रायगड लाॅन्स भोसे येथे अयोजीत करण्यात आले.
शहर तालुक्यातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. ह्याच त्यांच्यावरील प्रेमापोटी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. तसेच गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात अन्नदान तर देवडे येथे धान्यवाटप करण्यात आले होते.
१ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणाहून नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.