पंढरपूर : ईगल आय मीडिया
यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. भागातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गाळपास आणू. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊ, पुढील काही दिवसांपासून एकरी ऊस उतारा जास्त मिळावा यासाठी प्रशिक्षण शाळा गावोगावी देण्यात येईल असे प्रतिपादन dvp उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
धाराशिव साखर कारखाना युनिट ३ च्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज प्रगतशील शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
काटा पुजन करून ऊस गव्हाणीत टाकण्यात आला. परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी
कैलासगिर महाराज, व्यंकटराव आरसुळे, नामदेवराव गवते, तुकाराम लुटे, शिवाजी चव्हाण, रामराव वाके, व्यंकटराव कदम, एकनाथ ढोणे, ज्ञानेश्वर जामगे, नागनाथ कुसनुरे, नागोराव घुमे, पंढरी वानखेडे, रामराव पवार, गंगाधर बोमनाळे, ज्ञानेश्वर देसाई तसेच कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष काबंळे, सुहास शिंदे व गौरव दोशी, छावा संघटनचे माऊली पवार आदी मान्यवरांच्या शुभहस्ते मोळी टाकण्यात आली.
यावर्षी पाच लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचारी व शेतकरी हा कारखानादारीचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकून तर कर्मचाऱ्यांना पगार वाढीची घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली.