Dvp च्या कार्यालय आणि साखर कारखान्यावर आय कर विभागाचे छापे

प्रतिनिधी : पंढरपूर

Dvp उद्योग समूहाच्या पंढरपूर येथील कार्यालयासह नांदेड,नाशिक आणि चोराखळी जि उस्मानाबाद येथील साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. गुरुवार सकाळी 6 वाजल्यापासून याठिकाणी आयकर विभागाच्या पथकांनी तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धाराशिव साखर कारखान्याचे प्रमुख आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या dvp उद्योग समूहाने नांदेड, धाराशिव, नाशिक, सांगोला येथील साखर कारखाने चालवले आहेत. नुकताच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्यांनी जिंकला असून या कारखान्याचे ते चेअरमन आहेत.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयकर विभागाच्या पथकांनी dvp च्या पंढरपूर येथील कार्यालय, अभिजित पाटील यांच्या निवासस्थानी, नांदेड, नाशिक आणि चोराखळी येथील साखर कारखान्यावर छापे टाकले आहेत. आयकर विभागाची पथके या ठीकाणी तपासणी करीत आहेत आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!