११ कामगारांच्या हस्ते मिल रोलर पूजन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
अनेक।वर्षे बंद असलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर चे पूजन आज करण्यात आले. Dvp उद्योग समूहाने भाडे तत्वावर हा कारखाना चालवण्यास घेतला असून धाराशिव साखर कारखाना युनिट 4 या नावे कारखाना चालवला जात आहे. आज सांगोला साखर कारखाना गळीत हंगाम सन २०२१-२०२२ चा “मिल रोलर पूजन” धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या ११ कामगारांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांत, कामगारांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून कारखाना सुस्थितीत आणला. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थित पार पडले.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा पावसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. या हंगामात लवकर कारखाना सुरू करून भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू. पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे अवाहन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, रणजीत भोसले, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सुहास शिंदे यासह जेष्ठ संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, विश्वंभर चव्हाण, संजय मेटकरी तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी, जेष्ठ मंडळी, मित्र परिवार यांच्या उपस्थित पार पडला.