उसाला उच्चतम भाव देण्याची चेअरमन अभिजित पाटील यांची घोषणा
टीम : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या काळात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करून कारखाना गाळपास सज्ज केला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्या. यावर्षी उच्चांक गाळप करून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याची घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली.
Dvp उद्योग समूहाच्या शिवणी ( ता. लोहा, जि. नांदेड ) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट३, चा दुसर्या गळीत हंगामाचा पहिला बाॅयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न झाला. यावेळी पाटील बोलत होते.
प्रारंभी नांदेड महाराष्ट्र राज्य शिखर बॅक चे सह. व्यवस्थापक भरत पाटील, वसंत शिंदे, कदम, कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळाच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तर साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते होम हवन संपन्न करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक व सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते. सांगता समारोप कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी केले.