उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांची बदली

विक्रम कदम नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विक्रम रमाकांत कदम हे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणणं नियुक्त झाले आहेत. रात्री उशिरा राज्यातील 105 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.

डॉ कवडे यांचे नियुक्ती चे स्थान अद्याप निश्चित झाले नाही परंतु त्यांच्या ठिकाणी विक्रम रमाकांत कदम यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. सागर कवडे यांची 2 वर्षांपूर्वी येथे बदली झाली होती. या दोन वर्षात त्यांनी केलेले कार्य पंढरपूर च्या जनतेच्या कायम लक्षात राहील असे आहे.

मराठा, धनगर आरक्षण, चारही प्रमुख यात्रा, गेल्यावर्षीची पूरस्थिती आणि यंदाचा कोरोना महारोग या काळात कवडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केले. विशेषतः पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी जराही विस्कळीत होऊ दिली नाही. अनेक सामाजिक तणावाच्याप्रसंगी त्यांनी कठोर होऊन तर कधी सामोपचाराने मार्ग काढून कायदा सुव्यवस्था अबाधित राखली.

या दरम्यान त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यातही सुसूत्रता राखली, त्यांनी जेमतेम 2 वर्षात आपल्या कार्याची छाप पंढरपूरकरांच्या मनावर उमटवली.

Leave a Reply

error: Content is protected !!